भोकरदन तालुक्यातील आव्हाणा शिवारातून मोठी बातमी समोर आली आहे.
येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला आहे.
या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी उमेश टेकाळे आणि त्यांच्या पथकाने केली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास भोकरदन पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *