जालना | प्रतिनिधीजालना जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत घरफोडी करणारे २ आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारा १ आरोपी अशा एकूण ३ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रंगनाथनगर परिसरात घरफोडी करून फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वलीमामु दर्गा परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी रंगनाथनगरसह शहरातील विविध भागांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली.या आरोपींकडून तालुका जालना, सदर बाजार पोलीस ठाणे हद्द तसेच इतर ठिकाणांतील मिळून एकूण ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आदी मुद्देमाल चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून एकूण १,१९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुंदरसिंग सुखुसिंग राजपूत (वय ३४, रा. वलीमामु दर्गा, जालना), लाजरस शांतीलाल मिसाळ (वय १९, रा. वलीमामु दर्गा, जालना) आणि मनोज कलाजी धानुरे (वय ३०, रा. दर्गावेस काद्राबाद, जालना) यांचा समावेश आहे.या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.या कारवाईमुळे जालना शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये मोठा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे. Post navigation कडक उन्हानंतर जालन्यात मुसळधार पाऊस; शहरातील रस्ते जलमय, नाल्यांचे पाणी ओसंडून वाहिलेअचानक बदललेल्या वातावरणाने नागरिकांना दिलासा; बच्चेकंपनीचा पावसात आनंदोत्सव चंदनझीरा पोलिसांची मोठी कामगिरी; अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोडनॅशनल नगर परिसरात छापा; मोठ्या प्रमाणात मांस व जनावरे जप्त